fbpx

…तर तीन महिन्यात अद्यावत शिवसेना कार्यालय उभे करू : गजानन मालपुरे

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२१ । जिल्ह्यातील शिवसेनेचे मुख्य कार्यालय दुर्लक्षित असून अखेरच्या घटका मोजत असल्याचे वृत्त जळगाव लाईव्ह न्युज ने प्रकाशित केले होते. जळगाव लाईव्ह वृत्ताची दखल घेत काही माजी शिवसैनिक पुढे सरसावले आहेत.

आज शिवसेनेच्या ५५ वा वर्धापन दिनानिमित्तचे औचित्य साधून जळगाव शिवसेना शहर कार्यालयाची दुरवस्था दूर करून अद्यावत कार्यालय शिवसैनिकांसाठी उपलब्ध व्हावा म्हणून समस्त शिवसैनिकांनी हा संकल्प केलेला आहे. पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संपर्क नेते संजय राऊत व समन्वयक रविंद्र मिर्लेकर यांनी आम्हाला आदेश दिले तर आम्ही तीन महिन्याच्या आत अद्यावत कार्यालय उभे करू कसे शिवसेना माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे यांनी जळगाव लाईव्ह न्यूजशी बोलतांना सांगितले.

यावेळी राहुल नेतलेकर चेतन प्रभूदेसाई, लोकेश पाटील, राजेंद्र पाटील, सोहम विसपुते, भैय्या वाघ, विजय चौधरी, दिलीप बारी, जितेंद्र गवळी, चेतन पाटील, टिंकू तलरेजा, अक्षय अहिरराव, बजरंग सपकाळे, सुनील ठाकूर, धनंजय भोळे, ललित कोतवाल, सागर कुटुंबळे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

शिवसैनिक लोकेश पाटील यांनी याबाबत जळगाव लाईव्ह न्युज सॊबत केलेली खास बातचीत..

shivsena jalgaon (1)

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज