fbpx

शिवसेना स्वीकृत नगरसेवकपदी विराज कावडीया

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुलै २०२१ । शहर मनपात शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक अमर जैन यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या रिक्त असलेल्या जागी शिवसेनेकडून युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक विराज कावडीया यांच्या नावाची शिफारस करण्यात आली असून ते नाव अंतिम मानले जात आहे.

जळगाव मनपातील शिवसेनेचे संख्याबळ लक्षात घेता त्यांना एक स्वीकृत सदस्य सभागृहात पाठविता येतो. पहिल्या टप्प्यात अमर जैन यांची पक्षाने निवड केली होती. काही महिन्यांपूर्वी जैन यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागी जाकिर पठाण, विराज कावडीया, निलेश पाटील यांच्यासह आणखी दोन-तीन नावांची चर्चा होती. दरम्यान या सर्व चर्चेत विराज कावडीया यांनी बाजी मारली असून स्वीकृत नगरसेवक पदासाठी पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली असल्याचे महानगराध्यक्ष शरद तायडे यांनी सांगितले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज