fbpx

नगरसेवकांच्या पळापळीवर शिवराम पाटलांचा टोमणा

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२१ । शिवसेनेचे पांच नगरसेवक भाजपच्या पोत्यात.भाजपचे तीन नगरसेवक शिवसेनेने शिकार केलेत.भाजप मधील आमदार सेनेच्या तयारीत.अशा बातम्या पेपरला झळकतात.ही हेडलाईन वाचताच काका उद्गारले,माकडे पळालीत मंडपाकडे !

जळगाव असो कि मुक्ताईनगर. इकडचे नगरसेवक तिकडे आणि तिकडचे इकडे अशा घटना घडत आहेत.यात शिकारी पक्ष शेखी मारतात.आम्ही इतक्या माकडांची शिकार केली.आमची सर्कस वाढवली.आता हिच माकडे वापरून नगरपंचायत, महानगरपालिका लुटू.आता शंभर कोटी आमच्या खिशात.वाटरग्रेस आमच्या खाक्यात.आतापर्यंत तुम्ही लुटून खाल्ले.आता आम्ही खाऊ.आपण दोघे भाऊ भाऊ.

ग्रामपंचायत ,नगरपंचायत, नगरपंचायत,महापालिका या राजकीय नाहीत. त्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत.एक्झिक्युटिव्ह इन्स्टिट्यूशन आहेत.सरकार पैसा देते.यांच्या कडून काम करून घेते.मग आपली माणसे तेथे वडचणीवर जाळे लावून बसली पाहिजे. म्हणून हा आटीपाटीचा खेळ चालू असतो.या स्तरावर राजकारण नसतेच.धोरण नसतेच.फक्त असते लुटारूंच्या टोळ्या.म्हणून आधिकतम गुंड,गुन्हेगारांना उमेदवारी देऊन पक्षनेते आपले ध्येय साधण्याचा प्रयत्न करतात.आम्ही वरून निधी दिला तर खाली तो झोळीत झेलायला माकडे पाहिजे. माणसे नकोत.माणसे आम्हाला प्रश्न करतील.निधी दिला तर सोयी सुविधांसाठी का नाही वापरायचा ? येथे आम्ही चोरी करायची आणि तुम्हाला सोपवायची.आणि जेलची हवा आम्ही खायची का?असे प्रश्न करणारी माणसे नकोतच.म्हणून मुद्दाम टुणटुण उड्या मारणारी,मदारीला प्रश्न न करणारी माकडे हवी असतात.तिच माकडे इकडचे तिकडे,तिकडचे इकडे अशा उड्या मारतांना दिसत आहेत. म्हणून नागरिकही जास्त गांभिर्याने घेत नाहीत.

जळगाव जिल्हा पालकमंत्री भाजपचे होते.तेंव्हा सेना,आघाडी, राष्ट्रवादी, कांग्रेस मधून अनेकांनी भाजपकडे उड्या घेतल्या.अगदी एका दिवसात दोन दोन छलांग.सत्ता, मत्ता भाजपची म्हणून आम्ही तथाकथित शिक्षीत पण भिक्षीत नागरिकांनी डझनाच्या दराने मतदान केले.आम्ही सुद्धा हिच अपेक्षा ठेवली कि ही माकडे दहीमही चोरून आणतील तर त्यांच्या मुठीतून सांडलेले आपल्याला मिळेलच.जे चोरीचपाटी करणार नाहीत अशी खाष्ट आणि काष्ठ माणसे चोरणार नाहीत आणि देणार ही नाहीत. जळगाव च्या शिक्षीत व भिक्षीत नागरिकांचा असा हा दूर दृष्टिकोन असतो.

आता जळगावचे पालकमंत्री शिवसेनेचे आहेत.मग पोषण आहार तिकडेच मिळेल.फक्त निधीच नव्हे ,अन्नधान्य, रेतीमाती,दारूदर्फडा,सट्टा,गांजा, अफू याचा ठेका पालकमंत्री चा असतो.तसे अधिकृत परिपत्रक मुख्यमंत्री माननिय उद्धवराव  बाळासाहेब ठाकरे साहेंबांनी काढून प्रसारित करावे.अशी आमची विनंती आहे.या अनधिकृत धंद्यांना अधिकृत का करू नये?

जळगाव जिल्हा चे पालकमंत्री शिवसेनेचे आहेत म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थामधील लोकप्रतिनिधी पोषणआहाराच्या  मंडपाकडे गर्दी करणारच.

गुळावरती मुंगळे,शेणावरती माशा!
वरून किर्तन,आतून तमाशा !!

– शिवराम पाटील
9270963122
जळगाव जिल्हा जागृत जनमंच.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज