शिवाजीनगर पुलाच्या मक्तेदाराकडून प्रलंबित कामाबाबत खुलासा मागविला

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२१ । शिवाजीनगर उड्डाणपुलाचे नूतनीकरणाचे काम टाॅवर चाैक ते जुना शिवाजीनगर पूल या राेडलगत हाेत आहे. या ठिकाणी हाेत असलेल्या सार्वजनिक उपद्रव दूर करण्यासाठी तत्काळ उपचारात्मक उपाययाेजना करावी. जेणेकरून समस्या उदभवणार नाहीत. तसेच मक्तेदाराकडून प्रलंबित कामाबाबत खुलासा मागवून ताे अभिप्रायासह सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना दिले आहेत.

शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम गेल्या अनेक महिन्यापासून प्रलंबित आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना आदेश दिले आहेत. यात, शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम नियुक्त केलेल्या एजन्सी मार्फत सुरू आहे. या पुलाच्या कामाच्या प्रगतीबाबत वारंवार सूचना देण्यात आलेल्या आहेत. राेडच्या दुभाजकामधून वीज मंडळाच्या ११ केव्ही उच्च दाब वाहिनी गेलेली असून, हे इलेक्ट्रिक पाेलच्या स्थलांतराची कार्यवाही सुरू आहे. मात्र, पाेल स्थलांतर बाधा नसलेल्या घटकांचे कामही खाेळंबले असल्याने रस्त्याच्या दाेन्ही बाजूने माेठ्या प्रमाणावर खाेदकाम करून माेठमाेठे खड्डे झालेले आहे. त्यात पाणी साचून प्रवासी व नागरिकांना सार्वजनिक उपद्रव निर्माण हाेत आहे. त्यामुळे फाैजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ च्या कमल १३३ अन्वये निर्देशित करण्यात येते की, शिवाजीनगर उड्डाणपुलाचे नूतनीकरणाचे काम टाॅवर चाैक ते जुना शिवाजीनगर पूल या राेडलगत हाेत असून या ठिकाणी हाेत असलेल्या सार्वजनिक उपद्रव दूर करण्यासाठी तत्काळ उपचारात्मक उपाययाेजना करावी. जेणेकरून समस्या उदभवणार नाही. तसेच मक्तेदाराकडून प्रलंबित कामाबाबत खुलासा मागवून ताे अभिप्रायासह सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राऊत यांनी कार्यकारी अभियंता यांना दिले आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज