अखेर शिवाजी नगर उड्डाणपूल बनण्याचा मुख्य अडथळा दूर

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्युज | ४ सप्टेंबर २०२१ |  शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामांमध्ये अर्थळ ठरत असलेले विद्युत खांब अखेर हटवण्यात येणार आहेत. याबाबतचा दीड कोटीचा निधी दिला अखेर विभागीय आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. विभागीय आयुक्तांनी दिलेल्या मंजुरीमुळे लवकरच या पुलाचे काम सुरू होईल अशी नागरिकांना अपेक्षा आहे.

 

शिवाजीनगर उड्डाण पुलाच्या कामात मुख्य अडथळा ठरणाऱ्या महावितरणचे खांब अखेर पाठवण्यात येणार आहे. पुलाचे काम यामुळेच रखडले होते. जोपर्यंत हे विद्युत काम पाठवले जाणार नाही तोपर्यंत पुलाचे काम देखील होणार नाही असे म्हटले जात होते. राज्य शासनाची परवानगी मिळाल्यानंतर हे प्रकरण विभागीय आयुक्तांकडे पाठवले होते या कामाला मंजुरी मिळाली आहे त्यामुळे येत्या काळात लवकरच पुल देखिल म्हणून तयार होईल अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

 

पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी विभागीय आयुक्तांशी चर्चा केली त्यानंतर शुक्रवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी व विभागीय आयुक्त यांच्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली. आता विभागीय आयुक्तांनी या निधीला मंजुरी दिली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -