खा. निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे निवेदन

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२१ । राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी खासदार निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी चाळीसगाव तालुका शिवसेनेतर्फे पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी निलेश राणे याचे विरोधात शिवसैनिकांनी प्रचंड संताप व्यक्त करीत निषेधाच्या घोषणा दिल्या. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील, तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, शहर प्रमुख नाना कुमावत, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, धर्मा काळे, सुनील गायकवाड, वसीम चेअरमन, संजय ठाकरे, निलेश गायके, मिर्झा भाई, संजय पाटील, रवींद्र चौधरी, शैलेंद्र सातपुते, रामेश्वर चौधरी, विलास भोई, अनिल राठोड, आप्पा देवरे, जयेंद्र पाटील, दिलीप पाटील, राजेंद्र शिंदे, महिला आघाडीच्या प्रतिभा पवार, सुनंदा काटे, नकुल पाटील, सागर पाटील, हेमंत पाटील, अशोक सानप, जितेंद्र बोंदार्डे, रॉकी धामणे, धना रावते आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज