मुक्ताईनगरचे आ.चंद्रकांत पाटलांसह स्वीय सहाय्यक कोरोना पॉझिटिव्ह

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील व त्यांचे स्वीय साहाय्यक प्रविण चौधरी यांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

आ.चंद्रकांत पाटील यांनी याबाबतची माहिती स्वत: फेसबुक पेजवरुन दिली असून संपर्कातील व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन केले आहे. नुकतेच दोन दिवसांपुर्वी मुंबई येथून हिवाळी अधिवेशन आटोपून आल्यावर पाटील यांची तब्येत खालावली होती तसेच त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांनी चाचणी केली असता पाॅझिटिव्ह आली आहे.

दरम्यान, राज्यात गेल्या २४ तासांत ८ हजार ०६७ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, ८ करोना बाधित रुग्णांचे निधन झाले आहे. आरोग्य विभागाने आकडेवारी जारी केली आहे.

राज्यात करोना रुग्णांची झपाट्याने वाढत असलेली संख्या आणि ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग वाढत आहे. मुंबई, ठाणे, पुणे येथे करोना रुग्ण संक्रमण दर वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निर्बंध कठोर केले आहेत. तसंच, लग्न तसेच अन्य कार्यक्रमांसाठी हॉलमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी काटेकोर उपाययोजना करण्याबतचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ओमिक्रॉन रुग्णांची संख्याही राज्याची चिंता वाढवणारी आहे. राज्यात एकूण ४५४ ओमिक्रॉन रुग्ण आहेत.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -