fbpx

शिवसेनेचे रावेर लोकसभा मतदार संघातील नवीन पदाधिकारी जाहीर

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ जून २०२१ । शिवसेनेने संघटनात्मक बळकटीसाठी पक्षांतर्गत बदलांना सुरूवात केली आहे. त्यात जळगाव लोकसभेपाठोपाठ रावेर लोकसभा मतदार संघातील नवीन पदाधिकार्‍यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

यात सहसंपर्कप्रमुखपदी माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे तर जिल्हाप्रमुखपदी आमदार चंद्रकांत पाटील आणि समाधान महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रावेर लोकसभा मतदार संघात देखील शिवसेनेने दोन जिल्हाप्रमुख व सहसंपर्क प्रमुखांची नियुक्ती केली आहे. चोपड्याचे माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्यावर रावेर लोकसभा मतदार संघातील पाच विधानसभा मतदार संघांची जबाबदारी सोपवली आहे.

तर मुक्ताईनगर, रावेर व जामनेर विधानसभा मतदार संघासाठी आमदार चंद्रकांत पाटील, भुसावळ व चोपडा विधानसभा मतदार संघासाठी समाधान महाजन यांच्याकडे जबाबदारी असेल. या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदार संघात 4 जिल्हाप्रमुख व 2 सहसंपर्क प्रमुख पक्षाचे काम पाहतील.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज