मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने शिवसैनिकांकडून न्याज वाटप

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२१ । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने तसेच त्यांची प्रकृती ठीक झाल्याने जळगाव येथील शिवसैनिकांकडून गणेश कॉलनी परिसरातील ख्वाजा मिया दर्ग्यावर चादर चढवून न्याज वाटप करण्यात आली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मणक्याचा त्रास सुरु झाल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती मिळताच जळगावचे शिवसैनिक फरीद खान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी व त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी गणेश कॉलनी चौकातील ख्वाजा मिया बाबांच्या दर्ग्यावर प्रार्थना करून ११ किलो न्याज व ५० बांधवांना स्वखर्चाने अजमेर येथील दर्ग्यावर घेऊन जाण्याची मन्नत मागितली होती.

दरम्यान नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे समजताच शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, उमेश चौधरी, फरीद खान, फिरोज पिंजारी, जाकिर पठाण आदींनी गणेश कॉलनीतील ख्वाजा मिया दर्गावर जाऊन चादर चढविली व न्याज वाटप केले. दरम्यान, शिवसैनिक फरीद खान हे मानलेल्या मन्नतप्रमाणे दि.२१ नोव्हेंबर रोजी ५० शिवसैनिकांना स्वखर्चाने अजमेर येथे घेऊन जाणार आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज