शनिपेठ पोलिसांनी पकडले अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२२ । शहरातील कालिंका माता मंदिराजवळून भरधाव जात असलेले अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर गुरुवारी रात्री गस्तीवर असलेल्या शनिपेठ पोलिसांनी चालकासह डंपर ताब्यात घेतले आहे.

गिरणा नदीपात्रातून रात्री ११ वाजेनंतर अवैधरित्या वाळू उपसा करुन वाहतूक करण्यात येत आहे. नदीपात्रातून अवैध उपसा करुन वाळू वाहतूक करीत असलेले एमएच-१९, झेड-४८४७ या क्रमांकाचे समोरुन महाकाल व लावा ताकद असा मजकूर लिहिलेले डंपर रात्र गस्तीच्या पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी चालकासह डंपर ताब्यात घेवून पोलिस ठाण्यात आणले. या कारवाईबाबतचा अहवाल तहसील कार्यालयाला सादर करण्यात येणार आहे. त्या अवैध वाळूच्या डंपर मालकाला नवीन वाळू धोरणानुसार आढळून आलेल्या अवैध वाळूसाठ्याच्या चारपट प्रमाणे तहसीलदारांकडून अडीच लाख रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान, शहरात रात्रीच्यावेळी बिनधास्तपणे अवैध वाहतूक सुरू असून प्रशासन डाेळेझाक करीत आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -