अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ; संशयिताला अटक

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२१ ।  अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या जुबेर युसूफ पटेल ( वय २१. रा.साकेगाव, ता. भुसावळ ) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने म्हसावद, ता. जळगाव येथून अटक केली.

गुन्हा घडल्यानंतर जुबेर हा म्हसावद येथे आजोबांकडे आलेला होता. अटक करतेवेळी काही वेळ तणाव निर्माण झाला होता. साकेगाव येथे त्याने अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केला होता. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल आहे.

यांनी केली कारवाई 

पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर सहायक फौजदार अशोक महाजन, लक्ष्मण पाटील, अक्रम शेख, किशोर राठोड, रणजित जाधव, श्रीकृष्ण देशमुख, विनोद पाटील, ईश्वर पाटील व मुरलीधर बारी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज