जळगाव लाईव्ह न्यूज । २७ डिसेंबर २०२१ । कुऱ्हे पानाचे येथून जवळच असलेल्या गारखेडा-जामनेर रस्त्यावर २१ रोजी सकाळी आयशर ट्रकने अॅपेरिक्षाला समोरून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ३ ठार तर चार जण जखमी झाले होते. या अपघातातील जखमी रिक्षा चालक तरुणाचा देखील रविवारी उपचारादरम्यान, मृत्यू झाला आहे. त्यामुळे अपघातातील मृतांची संख्या चार झाली आहे. सागर समाधान टोंगळे (वय २२, रा.कुऱ्हा पानाचे) असे जखमी दरम्यान, जखमी अॅपेरिक्षा चालकाचे नाव आहे. दरम्यान, सागर याने माझी यात काहीही चूक नसल्याचं सांगत ट्रकचालकाने समोरून माझ्या अंगावर ट्रक आणली असल्याचा संवाद वडीलांसोबतचा अखेरचा संवाद ठरला.
याबाबत असे की, २१ डिसेंबर रोजी सकाळी गारखेडा-जामनेर रस्त्यावर ट्रकने अॅपेरिक्षाला समोरून जोरदार धडक दिली. यात तीन जणांचा जागेच मृत्यू झाला तर चार गंभीर झाले होते. जखमींमध्ये अॅपेरिक्षा चालक सागरच्या चेहऱ्यावर, छातीत व पायाला मार लागला होता. छातीत मार लागल्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. गेल्या पाच दिवसांपासून तो ऑक्सिजनवर होता. शेवटी मृत्यूशी झुंज देताना रविवारी सकाळी त्याची प्राणज्योत विझली. सागरच्या पश्चात आई, वडील, भाऊ, वहिनी असा परिवार आहे. याच अपघातातील पूनमचंद भोई व मनीष सोनवणे यांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत.
मृत सागरने आयटीआय इलेक्ट्रीशयनचे शिक्षण घेतले होते. नोकरीसाठी त्याने अनेक ठिकाणी अर्ज केले होते. १ जानेवारीपासून तो एका कंपनीत रुजू होणार होता. तत्पुर्वी वडीलांना मदत करण्यासाठी तो अॅपेरिक्षा चालवत होता.
वडीलांसोबतचा अखेरचा संवाद
‘माझी चूक नव्हती’ “बाबा माझी काहीच चूक नव्हती, मी आपल्या साईडला बरोबर रिक्षा चालवत होतो. ट्रकचालकाने समोरून माझ्या अंगावर ट्रक आणली. ट्रक इतकी वेगाने होती की, मला रिक्षाखाली उतरायला क्षणभरही संधी मिळाली नाही’, हा सागरचा वडीलांसोबतचा अखेरचा संवाद ठरला.
हे देखील वाचा :
- जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटीलांचा पुन्हा विजय ; विरोधकांना चारली धूळ
- जळगाव शहरातून राजूमामा भोळे यांची विजयी हॅट्रिक
- महाराष्ट्र्रात पुन्हा महायुतीचे सरकार; ‘या’ 5 मुद्द्यांमुळे मिळाला विजय..
- जळगाव जिल्ह्यात मविआला धोबीपछाड! सर्वच ११ जागांवर महायुतीचा विजय निश्चित
- महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार? मविआ सर्वात मोठा धक्का, आताची आकडेवारी वाचा