मारवड पोलिस ठाण्यातील सात कर्मचारी पॉझिटिव्ह

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जानेवारी २०२२ । मारवड पोलिस ठाण्यात पॉझिटिव्ह अंमलदाराच्या संपर्कात आलेल्या २२ पोलिस कर्मचाऱ्यांपैकी ७ अंमलदार व चालकाला कोरोनाची लागण झाली आहे. आणखी तीन पोलिसांचे अहवाल प्रलंबित आहेत.

सहायक पोलिस निरीक्षक जयेश खलाणे यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मारवड पोलिस ठाण्यातील सर्व पोलिस कर्मचाऱ्यांची स्वॅब तपासणी केली जात आहे. बाधित पोलिस कर्मचाऱ्यांपैकी दोघे खासगी रुग्णालयात दाखल असून, अन्य सर्वजण होम क्वारंटाईन आहेत. सर्वच पोलिसांनी दोन्ही डोस घेतले आहेत, त्यामुळे बाधितांपैकी सर्वांना सौम्य लक्षणे आहेत. ७ पोलिस बाधित झाल्याने, ६० गावांची जबाबदारी १५ पोलिसांवर आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar