सेवा परमो धर्म: हीच, भगवान महावीर स्वामींची शिकवण

राका कुटुंबीयांच्या सत्कार प्रसंगी महापौरांचे गौरवोद्गार

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२१ । आज महापौर जयश्री सुनिल महाजन यांनी समस्त जैन समाज तसेच सर्वांनाच भगवान महावीर जयंती निमित्त शुभेच्छा दिल्यात. अनेकांना व्यक्तिगत फोन करून त्यांनी आपल्या सदभावना व्यक्त करत शुभेच्छा दिलेत. तसेच श्रीमती सुशीला इंदरचंद राका, सौ.अपूर्वा राका, त्यांचे पती अतुल राका, त्यांची मुलगी डॉक्टर दिशा व मुलगा ईशान राका या सर्वांना आज भेट देत भगवान महावीर जयंतीच्या प्रसंगावर श्रीमती सुशीला इंदरचंद राका यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुछ देवून त्यांना पेढा भरवून सर्वांचे अभिनंदन ही केले.

या कोरोना काळात ज्या घरांमध्ये स्वयंपाक करणार कोणीही नाही, अशा सर्व जणांना गेल्या वर्षभरापासून दररोज 100 हून अधिक लोकांना सकस शुद्ध शाकाहारी जेवण बनवून, राका परिवार नि:शुल्क सेवा देत असल्याने आज त्यांच्या घरी प्रत्यक्ष जावून त्यांचे सत्कार केले. समाजाप्रती आपली आत्मीयता, सदभावना व सेवा हीच खरी भगवान महावीरांची शिकवण आपण आचरणात आणत आहात म्हणूनच मला आज प्रत्यक्ष तुम्हाला भेटताना तुमचा सत्कार करताना मनापासून आनंद होत आहे, ही भावना याप्रसंगी त्यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी सौ. अपूर्वा राका यांच्या बरोबर मदत करणाऱ्या सौ.लता थोरात ,सौ.सोनी काळे व सौ.वैशाली चिमणकर यांचाही पुष्पगुच्छ देऊन महापौरांनी सत्कार केला. याप्रसंगी माजी नगरसेवक अमर जैन व ललित धांडे हे उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज