खळबळजनक : भडगाव – चाळीसगाव रस्त्यावर १४ तलवारीसह चौघे जेरबंद

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जानेवारी २०२२ । भडगाव – चाळीसगावकडे जात असणाऱ्या वाहनाची तपासणी केली असता त्यात १४ तलवारी आढळून आल्या असून, तलवारीसह चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर एक आरोपी प्रसार होण्यात यशस्वी झाला. ही कारवाई चोपडा ग्रामीण पोलिसांनी केली.

सूत्रानुसार मिळालेल्या माहिती आधारावर ओमनी कार मधून काही इसम छुप्या पद्धतीने तलवारी घेऊन जात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले चोपडा उपविभाग चोपडा यांना मिळाली. त्याआधारे अधिक तपास केला असता. एका वाहनातून या तलवारी सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले चोपडा उपविभाग चोपडा, चोपडा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक देविदास कुंनगर यांच्या पथकाने वाहनाची झाडाझडती घेतली असता. गाडीच्या मागे सीट कव्हर व गाडीच्या पत्र्याच्या मधल्या गॅपमध्ये १४ तलवारी लपवल्याचे निदर्शनास आले. यात १४ तलवारी चोपडा ग्रामीण पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

घटनास्थळी चार जणांना ताब्यात घेतले असून एक आरोपी प्रसार होण्यात यशस्वी झाला आहे. नेमक्या कोणत्या उद्देशाने या तलवारी आणल्या आहेत. याबाबत अधिक तपास सुरू आहे. सदर तलवारी हया शो साठीच्या अजिबात नसल्याचे सहा पोलिस अधिक्षक कृषिकेष रावले चोपडा उपविभाग चोपडा यांनी सांगितले आहे. सदर तलवारी हया स्वतंत्र बनावटीच्या असून घातपाताची शक्यता असू शकते. ते पुढील तपासात निष्पन्न होईलच असे त्यांनी सांगितले आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -