जळगाव लाईव्ह न्युज ! २० मार्च २०२२ ! अमळनेर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. नगरपालिकेच्या कचरा जमा करणाऱ्या घंटा गाडीत पुरूष जातीचे नवजात अभ्रक मयतस्थितीत आढळून आले. याप्रकरणी घंटागाडीचे चालक फिरोज समसोद्दिन खाटीक (वय-४५) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात महिलेवर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकार?
महापालिकेच्या घंटागाडीवरील चालक फिरोज समसोद्दिन खाटीक यांनी अमळनेर शहरातील वार्ड क्रमांक ८ येथील सम्राट कॉलनी, द्वारका नगर, बोरसे गल्ली, रामकृष्ण कॉलनी या परिसरातून फिरोज खाटील हे घंटागाडीतून ओला व सुखा कचरा जमा करून नगरपालिकेच्या टेकडीवरील कचरा डेपो येथे गाडी खाली केली. त्यावेळी कचरा डेपोवर काम करणाऱ्या महिलांना एका कागदात आणि प्लास्टिकच्या पिशवीत पुरूष जातीचे नवजात अभ्रक मयतस्थितीत आढळून आला.
त्यांनी कचराडेपो येथे धाव घेतली. त्याचप्रमाणे अमळनेर पोलीस ठाण्यात कळविण्यात आले. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. याप्रकरणी घंटागाडीचे चालक फिरोज खाटीक यांच्या फिर्यादीवरून अज्ञात महिलेवर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल हटकर करीत आहे.
हे देखील वाचा:
- जळगावकरांचे प्रचंड आभारी आहे; “हॅट्ट्रिक” साधून विजयी झाल्यानंतर आ. राजूमामांची प्रतिक्रिया
- जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटीलांचा पुन्हा विजय ; विरोधकांना चारली धूळ
- जळगाव शहरातून राजूमामा भोळे यांची विजयी हॅट्रिक
- महाराष्ट्र्रात पुन्हा महायुतीचे सरकार; ‘या’ 5 मुद्द्यांमुळे मिळाला विजय..
- जळगाव जिल्ह्यात मविआला धोबीपछाड! सर्वच ११ जागांवर महायुतीचा विजय निश्चित