ज्येष्ठ पत्रकार नूरुद्दीन मुल्लाजी सन्मानित

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ डिसेंबर २०२१ । एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील ज्येष्ठ पत्रकार तथा डॉ.एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार प्राप्त नुरुद्दीन मुल्लाजी यांनी पत्रकारितेत व समाज कार्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना  जळगाव येथील मन्यार बिरादरीतर्फे तसेच महापौर जयश्री महाजन व मुंबई उर्दू कारवाचे अध्यक्ष फरीद अहमद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते एजाज मलिक, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ.रफिक, मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, उपाध्यक्ष हकीम चौधरी या मान्यवरांचे सह जिल्ह्यातील उर्दू साहित्यिक, उर्दू शायर, पत्रकार बहुसंख्येने उपस्थित होते,

दरम्यान, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पाकीजा पटेल, एनुद्दीन, पठाण मंजूर, उस्मान पटेल, अडावद बस स्थानकचे वाहतूक नियंत्रक सरताज खान पठाण. एरंडोल बस स्थानक प्रमुख गोविंदा धोंडू बागुल, इक्बाल टेलर, मुंब्रा येथील डॉ.अहमद शेख, बुलढाणा येथील मौलाना आझाद विचार मंचचे जिल्हाध्यक्ष हाजी मुजम्मिल, सामाजिक कार्यकर्ते आनंदा हरी मिस्त्री, मुश्ताक शायर, जळगाव प्रजा न्यूज महाराष्ट्रचे संपादक प्रतिक जाधव व त्यांची सर्व टीम, जिल्ह्यातील मित्रपरिवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -