उद्या रायसोनी इस्टीट्यूटचा उद्योग आणि इस्टीट्यूट कनेक्ट करणारा “संगोष्ठी” उपक्रम

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२१ । जळगाव येथील जी. एच. रायसोनी इस्टीट्यूट ऑफ बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयातर्फे ता. २३ ऑक्टोबर शनिवार रोजी उद्योग आणि इस्टीट्यूटमधील विध्यार्थ्यांना कनेक्ट करणारा “संगोष्ठी” या महत्वाकांशी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या काळात अभियांत्रिकी,मॅनेजमेट,फार्मसी यासारखे विविध पदवीधारक युवक मोठ्याप्रमाणात महाविद्यालयातून शिक्षण घेवून बाहेर पडतात. म्हणजेच आजच्या विध्यार्थ्यांकडे आपण घेत असलेल्या विषयाचे परंपरागत ज्ञान आहे. परंतु आजच्या सत्यपरिस्थितीचे अवलोकन केले तर बाहेरच्या जगात लागणारे कौशल्य आणि शिक्षणात मिळणारे ज्ञान यात बऱ्यापैकी तफावत आढळून येते.

याच अनुषंगाने बाहेरील इंडस्ट्री व एज्युकेशन इस्टीट्यूट यांनी सामंजस्याने एकत्र येत व बरोबरीने हाताला हात देत काम केले तर आजच्या या क्रांतिकारी युगात एक उत्तम विध्यार्थी नक्कीच घडेल म्हणजेच इस्टीट्यूटमध्ये शिकत असतानाच विध्यार्थ्यानी उद्योगाशी कनेक्ट राहून, फिल्डवर जाऊन काम केले तर त्यांच्यात आपोआप उद्योगाला लागणारे कौशल्य आत्मसात होईल तसेच जर इस्टीट्यूटला ही उद्योगाला लागणारे मनुष्यबळ, कौशल्य यांचा अभ्यास झाला तर त्याप्रमाणे इस्टीट्यूट आपल्या अभ्यासक्रमात बदल करू शकते. आजच्या उद्योगाच्या जगात चौथ्या क्रांतीला सुरुवात झाली असून त्यात मोठ्याप्रमाणात आर्टिफ़िशिअल इटॅलीजंस, ब्लॉकचेन टेक्नोलॉजी यासारखे विविध तंत्र वापरास सुरुवात झाली असून हेच तंत्र जर इस्टीट्यूटने विध्यार्थ्यांना द्यायला सुरुवात केली तर उद्योगाला लागणारे विशिष्ठ मनुष्यबळ निर्माण होईल.

सध्याला उद्योग जगत व इस्टीट्यूट यांच्यात मोठयाप्रमाणात अंतर निर्माण झाले आहे त्यामुळे हे अंतर भरून काढण्यासाठी उद्योग व इस्टीट्यूट यांना एकत्र येऊन काम करण्याची गरज निर्माण झाली आहे. नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार इस्टीट्यूटने उद्योगाला लागणारे मनुष्यबळ निर्माण करून द्यावे तसेच उद्योगात येणारे विविध समस्या जर उद्योगांनी इस्टीट्यूटशी देवाण-घेवाण केली तर त्या समस्यावर इस्टीट्यूट व उद्योग सोबतीने काम करू शकते तसेच रायसोनी इस्टीट्यूटजवळ उद्योगाला लागणाऱ्या लॅब मोठ्याप्रमाणात असून त्या लॅबमध्ये उद्योगाशी सबंधित संशोधन घडू शकते त्याचप्रमाणे सर्व सुविधा युक्त असे इन्फ्रास्ट्रक्चर इस्टीट्यूट कडे असून त्याचा वापर उद्योगालाही करता येईल म्हणजेच जसे की, कॉम्प्युटर लॅब, मॅकेनिकल लॅब, स्थापत्य अभियांत्रिकी लॅब, ई अॅन्ड टी. सी., डेटा सायन्स या विविध विभागामधील तज्ञ प्राध्यापकांच्या सहाय्याने उद्योगात येणाऱ्या विविध समस्यावर येथे काम करून त्यावर उपाय शोधून ते उद्योगाला देवू शकतो.

त्यामुळे या सर्व बाबींचा सारांश काढण्यासाठी व यावर एका व्यासपीठावर मंथन करण्यासाठी रायसोनी इस्टीट्यूट ऑफ बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयातर्फे ता. २३ ऑक्टोबर शनिवार रोजी उद्योग आणि इस्टीट्यूटमधील विध्यार्थ्यांना कनेक्ट करणारा “संगोष्ठी” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी कार्यक्रमासाठी प्रा. तन्मय भाले, प्रा. मकरंद वाठ, प्रा. रफिक शेख, प्रा. राहुल त्रिवेदी, प्रा. ज्योती जाखेटे, प्रा. वासिम पटेल, प्रा. सौरभ गुप्ता, प्रा. दीपेन रजक, प्रा. सोनल पाटील, प्रा. सिद्धार्थ पांडे, प्रा. योगिता पाटील, प्रा. राज कांकरिया हे सहकार्य करीत असून या कार्यक्रमासाठी संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांचे मार्गदर्शन लाभले आहे. रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. सुनील रायसोनी, कार्यकारी संचालक श्री. प्रितम रायसोनी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

हे तज्ञ करणार मार्गदर्शन
या कार्यक्रमात मुंबई येथील मासियाचे बिजनेस पोलीक्लिनिक हेड श्री. मनीष पाटील तसेच पुणे येथील इनोव्हेशन जुगाड फंडाच्या सीईओ अनुराधा सोहोनी, ओरंगाबाद येथील मराठवाडा मॅजिक फॉर ग्रोथ चे सीईओ रोहित ओटी, जुगाड फंडाच्या कंटेट हेड अर्चना लालंगे व रायसोनी इस्टीट्यूटच्या इंक्यूबेशन सेंटर हेड डॉ. मृग्ना गुप्ता यांचे मार्गदर्शन लाभणार आहे

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज