fbpx

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशाकरीता 11 ऑगस्ट रोजी निवड चाचणी

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२१ । केंद्र शासन संचलित जवाहर नवोदय विद्यालय, साकेगाव (भुसावळ) जिल्हा जळगाव येथील इयत्ता ६ वीच्या सन २०२१-२२ प्रवेशाकरीता होणारी निवड चाचणी बुधवार, ११ ऑगस्ट, २०२१रोजी नियोजित करण्यात आली आहे. 

सर्व सबंधीत मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, अध्यापक, पालक व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी.  तसेच सदर परिक्षेचे प्रवेशपत्र navodaya.gov.in या वेबसाईट वरुन डाउनलोड करुन घ्यावेत.

अधिक माहितीकरीता 9404900916 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन प्राचार्य डॉ. आर. आर. खंडारे, जवाहर नवोदय विद्यालय, साकेगाव, भुसावळ यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज