‘रायसोनी’तील दोन विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय कंपनीत निवड

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ नोव्हेंबर २०२१ । जळगाव शहरातील जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मेनेजमेंट महाविद्यालयात ‘टीसीएस लिमिटेड’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत दोन विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे. अशी माहिती रायसोनी बिजनेस मॅनेजमेंटच्या संगणकशास्त्र, विज्ञान व माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख प्रा.सोनल पाटील यांनी दिली.

‘टीसीएस लिमिटेड’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीच्या निवड समितीने रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून महाविद्यालयातील कॉम्प्युटर विभागातील प्रित सुनीलकुमार जाधवानी व मो. फैज पटेल या दोन विद्यार्थ्यांची निवड केली. लॉकडाऊनच्या काळातही रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयात विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यानी ऑनलाईन मुलाखती घेतल्या व पात्र विद्यार्थ्यांची निवड केली. विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये रायसोनी महाविद्यालयाचे विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. कंपनीला कशा प्रकारचे विद्यार्थी हवे असतात? याचा सखोल अभ्यास करून ‘मागणी तसा पुरवठा’ या धोरणानुसार संबधित विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षण दिले जाते. या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे डीन प्रा.तन्मय भाले, ऑफिसर प्रा.हर्षद पाटील, प्रा.हिरालाल साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितम रायसोनी, संचालिका प्रा.डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमिक इंजिनिअरिंगचे डीन क्रिष्णकुमार पालीवाल, संगणकशास्त्र विभागप्रमुख प्रा.सोनल पाटील, प्रा.स्वाती पाटील, प्रा.शितल जाधव, प्रा.रफिक शेख, प्रा.राज कांकरिया आदींनी अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -