रायसोनी महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ डिसेंबर २०२१ । जळगाव शहरातील जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मेनेजमेंट महाविदयालयात नेक्स्ट कनेक्ट ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड, इम्पेक्ट प्रायव्हेट लिमिटेड, प्रो. रीलीक्स, टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस, वर्ल्ड प्ले प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांनी घेतलेल्या मुलाखतीत महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे, अशी माहिती रायसोनी बिजनेस मॅनेजमेंटच्या बीसीए विभाग प्रमुख प्रा. रफिक शेख यांनी दिली.

नेक्स्ट कनेक्ट ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड, इम्पेक्ट प्रायव्हेट लिमिटेड, प्रो. रीलीक्स, टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस, वर्ल्ड प्ले प्रायव्हेट लिमिटेड या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीच्या निवड समितीने रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून महाविद्यालयातील बीसीए विभागातील झरीयन सय्यद, शुभम शर्मा, अतुल बडगुजर, लिझा मडवानी, मोहित भोई, निखील वाणी, अरुणा मायटी या सात विद्यार्थ्यांची निवड केली. लॉकडाऊनच्या काळातही रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयात विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यानी ऑनलाईन मुलाखती घेतल्या व पात्र विद्यार्थ्यांची निवड केली. विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये रायसोनी महाविद्यालयाचे विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. कंपनीला कशा प्रकारचे विद्यार्थी हवे असतात? याचा सखोल अभ्यास करून ‘मागणी तसा पुरवठा’ या धोरणानुसार संबधित विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षण दिले जाते.

विद्यार्थ्यांना ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट विभागाचे डीन प्रा.तन्मय भाले, ऑफिसर प्रा. हर्षद पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितम रायसोनी, संचालिका प्रा.डॉ. प्रिती अग्रवाल यांनी अभिनंदन केले़.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -