युवा प्रदेश कार्याध्यक्ष पदी कृष्णा गवळी(गठरी) यांची निवड

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२१ । महाराष्ट्र राज्य वीरशैव लिंगायत गवळी समाज संघटना आयोजित युवा प्रदेश कार्यकारणी व जळगांव जिल्हा कार्यकारणी निवड पार पडली.

यावेळी संस्थेचे प्रदेश अध्यक्ष भिमराज घुगरे, प्रदेश उपाध्यक्ष शिवाजी बाचलकर, प्रदेश कार्याध्यक्ष राजेंद्र गठरी, प्रदेश सचिव राजेंद्र बिडकर, चाळीसगांव येथील सुपाजी पिरणाईक, सदाशिव निस्ताने, विजय लगडे, विशाल भागानगरे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला समाजाचे दैवत श्री शिदाजीआप्पा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी जळगाव महाराष्ट्र युवा प्रदेश कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यात महाराष्ट्र युवा प्रदेश अध्यक्ष पदी अक्षय बहिरवाडे अहमदनगर,जळगांव येथील कृष्णा खंडूआप्पा गठरी यांची महाराष्ट्र युवा प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.

जळगांव जिल्हा नूतन अध्यक्ष पदी श्री दिपक जोमीवाळे, उपाध्यक्ष रवींद्र परळकर कार्याध्यक्ष प्रकाश लंगोटे,जिल्हा सचीव नारायणराव बारसे, जिल्हा खजिनदार शंकर काटकर, मान्यवरांची निवड करण्यात आली. चाळीसगांव येथील विद्यार्थीनी कु.प्रतीक्षा चिपडे पुणे येथे IT कंपनीत नोकरी मिळाली तसेच धुळे महानगरपालिका नगरसेवक भगवान गवळी यांची उपमहापौर पदी निवड झाल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साठी सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -