डॉ. हर्षल पाटील यांची पशुसंवर्धन अधिकारीपदी निवड

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२१ । कोचूर ( ता.रावेर ) येथील डॉ. हर्षल पाटील यांची पशुसंवर्धन अधिकारी श्रेणी १ पदी एलडीओ-एमपीएससी परीक्षेद्वारे निवड झाली आहे.

डॉ. पाटील यांनी पहिल्याच प्रयत्नात हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल कोचूर बुद्रुकचे माजी सरपंच रवींद्र महाजन, चंद्रकांत राऊत, प्रकाश राऊत, शैलेंद्र पाटील, चंद्रकांत पाटील, मुरलीधर पाटील, मोहन पाटील, ललित महाजन आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. डाॅ.पाटील हे येथील सेवानिवृत्त पोस्टमास्तर कडू पाटील यांचे नातू व गोपाळ पाटील, ह.मु.कल्याण यांचे सुपूत्र हाेते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज