fbpx

MPSC च्या 4 सप्टेंबर रोजी होणाऱ्या परिक्षा केंद्र परिसरात कलम 144 लागू

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑगस्ट २०२१ । महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांचेमार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परिक्षा-2020 शनिवार, दिनांक 4 सप्टेंबर, 2021 रोजी रोजी सकाळी 11.00 ते 12.00 यावेळेत जळगाव शहरातील एकूण 35 उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे.

या परिक्षेच्यावेळी कोणताही गैरप्रकार होवू नये व त्याठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये, याकरीता खबरदारीचे उपाय म्हणून 4 सप्टेंबर, 2021 रोजी सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत जळगाव शहरातील एकूण 35 उपकेंद्रावर जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (2) (3) लागू केले आहे.

या परिक्षा केंद्राचे 100 मीटर परिसरात कोणीही प्रवेश करु नये. हे आदेश परिक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस, होमगार्ड यांचेसाठी लागु होणार नाही. त्याचबरोबर सर्व सबंधितांवर वैयक्तिकरित्या नोटीस बजाविण्यास पुरेसा कालावधी नसलेने फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे प्रकल्प 144 (2) नुसार हे आदेश एकतर्फी काढण्यात येत असल्याचेही जिल्हादंडाधिकारी यांनी आदेशात म्हटले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज