fbpx

सावदा येथील दोन पतसंस्थानचे कार्यालयास नगरपालिकेतर्फे सील

mi-advt

सावदा (प्रतिनिधी) – सावदा नगर पालिकेची कराची थकबाक़ी असलेल्या येथील दोन पतसंस्थानचे कार्यालयास नगर पालिकेतर्फे सील लावण्यात आले. यात सावदा मर्चंट पतसंस्था तसेच लोकसेवा नागरी सहकारी पतसंस्था या दोन संस्थानचा समावेश आहे.

यात सावदा मर्चन्ट पतसंस्थेकड़े नगरपालिकेची कराची थकीत रक्कम रु दोन लाख चौतीस हजारांची थकबाक़ी आहे दि 1/4/2021 रोजी या वसूली साठी अश्याच प्रकारे सील केले होते. परंतु 26/4/2021रोजी प्रशाकीय अधिकारी विजयसिंह गवळी व डी.व्ही.पाटील यांनी नगरपालिकेला हमीपत्र लिहून दिले होते की, आम्ही एक महिन्याच्या आत कराची रक्कम भरणा करू परंतु रक्कम भरणा न केल्याने आज पुन्हा नगरपालिकेने  सदर सावदा मर्चन्ट पतसंस्थेस सील लावले आहे.

सोबत थकबाक़ी असलेल्या लोकसेवा नागरी सहकारी पतसंस्था यास देखील सील लावण्यात आले. ही कार्यवाही नगर पालिकेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी यांचे मार्गदर्शनाखाली वसूली विभाग प्रमुख अनिल आहूजा, लिपिक अरुण ठोसरे, कर्मचारी राजू मोरे आदिनी केली दरम्यान मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी अश्या प्रकारे थकबाक़ी असणाऱ्यानी लवकरात लवकर थकबाक़ी भरावी अन्यथा त्यांचेवर अश्याच प्रकारे कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt