fbpx

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सावदा येथील मिठाई दुकान सील

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२१ । सावदा येथील बस स्टैंड परिसरात असलेले शिव राजस्थान हे मिठाई दुकान लॉकडाउन सुरु असताना देखील दि.14 रोजी सायंकाळी 5 वा सुरु होते. याबाबत सोशल मिडियावर सदर दुकान बाबत फोटो सह प्रसिद्ध झाले होते. यानंतर यादुकांनावर काय कार्यवाही होते याकडे लक्ष लागून होते.

दरम्यान दी 15 रोजी पुन्हा 5 वाजे दरम्यान हे मिठाई दुकान उघडे होते याबाबत सावदा नगर पालिकेचे कार्यालय अधीक्षक सचिन चोलके यांना माहिती मिळताच त्यांनी याठिकानी जाऊन सदर दुकान सील करण्याची कार्यवाही केली यावेळी कार्यालय अधीक्षक सचिन चोलके, किरण चौधरी, भागवत घोघले, यांचे सह कर्मचारी यांनी ही कार्यवाही केली.

सावदा शहरात लॉकडाउन काळात अनेक ठीकानी अद्याप देखील खुले आम काही व्यवसाय सुरु असून यात पार्सल सेवेच्या नाव खाली काही हॉटेल चालक दुसरेच व्यवसाय करीत असून यांचेवर देखील केव्हा कार्यवाही होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज