fbpx

सावदा पालिकेकडून कर वसूलीसाठी पतसंस्थेचे कार्यालय सील

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज ।०१ एप्रिल २०२१ । सावदा नगर पालिका कर वसूलीसाठी जिल्ह्यात अव्वल नंबर आहे. नागरिक देखील सहकार्य करीत आपला कर भरणा भरित असतात. परंतु मार्च महीना उलटल्यावरही काही मोठ्या थकबाक़ी दारानी अद्याप आपल्या कडील कर भरणा केला नसल्याने पालिकेने अश्या विरुद्ध धडक कार्यवाही सुरु केली आहे.

येथील सावदा मर्चंट पतसंस्थेवर देखील गेल्या अनेक दिवसांची कर थकबाक़ी होती त्यांना पालिकेने वारवार नोटिस देखील बजवली पण त्यांनी कर भरणा न केल्याने सावदा नगर पालिकेने दी 1 रोजी बेधडक कार्यवाही नगर पालिकेची थकबाकी न भरल्याने या संस्थेच्या कार्यालयास सील लावल्याने सावदा शहरात सर्वत्र  खळबळ उडाली असून थकबाक़ीदार यांनी अश्या कार्यवाही होऊ नये म्हणून आपला थकित कर भरणा लवकर भरावा असे आवाहन मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी केले आहे.

तर शहरात अद्याप अनेक अश्या बंद संस्था व प्रतिष्ठान आहेत ज्यांचे कड़े मोठ्या थकबाक़ी आहेत त्यांचे वर देखील अश्या प्रकारची कार्यवाही नगर पालिका करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज