गरजू विद्यार्थ्यासाठी एसडी-सीडचा उद्या शिष्यवृत्ती वितरण सोहळा

जळगाव लाईव्ह न्यूज । २० नोव्हेंबर २०२१ । शिवाजीनगरात रविवारी २१ रोजी सायंकाळी ५ वाजता माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. विश्वास पाटील यांच्या हस्ते प्रज्ञावंत, गरजू विद्यार्थ्यासाठी एसडी-सीडतर्फे शिष्यवृत्ती वितरीत करण्यात येणार आहे. तसेच कोरोना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता. या कार्यक्रमाचे एसडी-सीडच्या फेसबुक आणि युट्यूब पेजवर लाईव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे.

आमंत्रित शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, पालक, शिक्षक व प्राध्यापक, साहित्यिक, विद्यार्थी चळवळीशी संबंधित शिक्षणप्रेमी मान्यवरांनी या शिष्यवृत्ती सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन एसडी-सीड अध्यक्षा रत्नाभाभी जैन, कार्याध्यक्षा मीनाक्षीताई जैन, गव्हनिंग बोर्ड चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी एसडी-सीडच्या www.sdseed.in या वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

पाटील यांचे व्यक्तिमहत्व 

डॉ. विश्वासराव पाटील हे ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, सिद्धहस्त लेखक, प्रेरणादायी डॉ. विश्वास पाटील मार्गदर्शक यशस्वी प्रशासक, संवेदनशील समाजसुधारक असे बहुआयामी पैलू लाभलेले व्यक्तिमत्त्व आहेत. ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संचलित धुळे येथील महात्मा गांधी तत्त्वज्ञान केंद्राचे कार्याध्यक्ष आहेत. मराठी हिंदी भाषेतील अनेक शोधग्रंथ, जीवनीग्रंथ, संपादित ग्रंथ, अनुवादित ग्रंथ अशी त्यांची मोठी ग्रंथसंपदा आहे. गांधी विचार तळागाळापर्यंत पोचविणारे ते प्रेरणादायी वक्ते व मार्गदर्शक आहेत. त्यांची काही पुस्तके महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज