fbpx

शिक्षकांचा असाही उपक्रम ; ‘ओट्यावर शाळा’ राबवून शिक्षणाचा नवा पर्याय उभा

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑगस्ट २०२१ । कोरोनाचा प्रादुर्भावामुळे शिक्षणाचा बोजवारा उडाला असून मोठ्या शाळांनी ऑनलाईन शिक्षणाचा नवा पर्याय उभा केलाय. त्यातही  ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा व शिक्षकांना हा ऑनलाईनचा पर्याय राबविण्यास मोठी अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागत आहे. जि.प.च्या अनेक शाळा बंद असताना, जळगाव तालुक्यातील सावखेडा खु. येथील शिक्षकांनी गावात ‘ओट्यावर शाळा’ हा अभिनव उपक्रम राबवून शिक्षणाचा नवा पर्याय उभा केला आहे.

जळगाव तालुक्यातील सावखेडा खु. हे गाव शहरापासून दुर असल्याने इंटरनेटची समस्या देखील नेहमीच असते. अशा परिस्थितीत मोबाईलवर ऑनलाईन पध्दतीने शिक्षण देण्यास अनेक अडथळे येतात. त्यामुळे गावातील जि.प.शाळेतील प्रत्येक विद्यार्थी सकाळी 10 वाजता आपआपल्या घरातील ओट्यावर येवून आपले दप्तर घेवून बसत आहे.

या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाला मुख्याध्यापक अरुण चौधरी, प्रवीण चौधरी व किरण सपकाळे या शिक्षकांनी चांगल्याप्रकारे राबवून इतर शाळांसाठी देखील नवा पर्याय उभा केला आहे. या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाची विद्यार्थी देखील मजा घेत आहेत.

तीन्ही शिक्षक दररोज जळगावहूनच प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठीचा दररोजचा अभ्यास क्रमाची झेरॉक्स काढून काही प्रश्नावली घेवून येतात. नंतर तीच प्रश्नावली गावातील प्रत्येक विद्यार्थ्याचा ओट्यापर्यंत पोहचवून विद्यार्थ्यांना दिली जाते. परत तासानंतर शिक्षक पुन्हा विद्यार्थ्यांकडे येतात. ओट्यावर बसून प्रत्येक विद्यार्थ्यांला भेटून त्याने सोडविलेले उत्तरे तपासून त्याने केलेल्या चुकांचे निरसन करत असतात.

सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ही ‘ओट्यावरची शाळा’ दररोज भरत असते, असं शाळेचे मुख्याध्यापक अरुणकुमार चौधरी यांनी सांगितलं आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज