पोहण्याचा मोह जीवावर बेतला; शाळकरी मुलाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

बातमी शेअर करा

ळगाव लाईव्ह न्यूज । २ डिसेंबर २०२२ । नदीपात्रात पोहण्याचा मोह एका शाळकरी मुलाच्या जीवावर बेतली आहे. पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील १७ वर्षीय शाळकरी मुलाचा माहेजी येथील गिरणा नदीपात्रात पोहताना बुडून मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी दुपारी घडलीय. हर्षल संजय तावडे असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

याबाबत असे की, नांद्रा येथील संजय अवचित तावडे यांना दोन मुले होती. हर्षल हा लहान होता. वडिलांचा शेतीचा व्यवसाय, अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेला हर्षल अभ्‍यासात हुशार होता. परंतु, नववर्षाच्‍या दुसऱ्याच दिवशी हर्षलचा मृत्‍यू झाल्‍याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

हर्षल काही मित्रांसोबत माहेजी येथील गिरणा नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे डोहात बुडून त्याचा मृत्यू झाला. हनुमंतखेडा येथील नावेकरींनी शोध घेऊन त्याला बाहेर काढले. परंतु तोपर्यंत फार उशीर झाला होता. हर्षलने दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर जळगाव येथे बबनभाऊ बाहेती महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेतला होता. शाळकरी मुलांचा अशा दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. हर्षल हा अभ्यासात अत्यंत हुशार होता.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -