कासमपुरा शाळेत चोरी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जानेवारी २०२२ । पाचाेरा तालुक्यातील कासमपुरा येथील राम सीता शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयात बसवलेल्या ८ सीसीटीव्ही कॅमेरे व इतर साहित्याची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना ६ रोजी झाली आहे. या प्रकरणी मुख्याध्यापक युवराज बोरसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा झाला आहे.

कासमपुरा येथील राम सीता शिक्षण मंडळ विद्यालय ७ रोजी शिपाई नारायण मर्मट यांनी उघडले असता विद्यालयात बसवण्यात आलेले सीपी प्लस कंपनीचे २४ हजार रुपये किमतीचे ८ सीसीटीव्ही, मुख्य विद्युत पुरवठा करणारी ६० फूट वायर, २ एलएडी बल्ब या साहित्याची चाेरी झाल्याचे लक्षात आले. दरम्यान यापूर्वीही ३० एप्रिल २०२१ रोजी देखील विद्यालयात शाळेच्या प्रयोगशाळेतील संपूर्ण ६२ हजार किमतीच्या कॉम्प्युटर संचाची चोरी झाली होती. रितसर तक्रार करूनही अद्यापही चोरीचा तपास लागलेला नाही. तसेच ही शाळा इयत्ता १० वी व १२ वीच्या बाेर्ड परीक्षेचे केंद्र आहे. कार्यालयात गोपनीय व अति महत्त्वाची कागदपत्रे, प्रमाणपत्रे, शालेय अभिलेख, शासकीय अनुदान रकमेची आदेश पत्रे असतात. त्यामुळे अशा चोऱ्यांचे प्रकार वाढल्याने विद्यार्थ्यांचे, कर्मचाऱ्यांचे शैक्षणिक, आर्थिक नुकसान होऊ शकते, असे मुख्याध्यापक बोरसे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकाॅन्स्टेबल अरविंद मोरे करत आहेत.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -