fbpx

आ. लता सोनवणे यांचे हस्ते घोडगाव येथे शाळा  व अंगणवाडी खोलीचे लोकार्पण

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज | १ सप्टेंबर २०२१ | लासुर घोडगाव गटातील जिल्हा परिषद सदस्य हरीश पाटील यांच्या निधीतून घोडगाव येथे जिल्हा परिषद शाळा खोली लोकार्पण व अंगणवाडी खोली लोकार्पण असे विविध कामाचे भूमिपूजन आ. लता सोनवणे यांचे हस्ते करण्यात आले.

या अनुषंगाने अनेर परिसरात विकास कामांची आमदार व जि.प.सदस्य यांच्यामार्फत चांगलीच विकास गंगा वाहू लागली असून परिसरातील व गावागावातील ग्रामस्थांनी आ. लता सोनवणे व हरीश पाटील यांचे आभार मानले व शुभेच्छाचा वर्षाव होतांना दिसून येत होते. यावेळी परिसरातील सर्व ग्रामपंचायत येथील सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी आवर्जून उपस्थिती दिसून आली.

यावेळी माजी उपसभापती एम. व्ही. नाना पाटील, चोपडा तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील, युवा सेना प्रमुख गोपाल चौधरी, दीपक चौधरी, सुकलाल कोळी, घोडगाव सरपंच इंदुबाई भिल, उपसरपंच जयवंत पाटील, किशोर दुसाने, सुनील कोळी, माजी सरपंच दिलीप कोळी, सुनील पाटील, गणेश पाटील, गलंगी सरपंच शितल देवराज, हेमंत वाणी, किरण देवराज, कैलास बाविस्कर, आदि कार्यकर्ते उपस्थित होते

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज