fbpx

रायसोनी समूहाद्वारे ‘स्कुल ऑफ लीडरशिप’ उपक्रम

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२१ । रायसोनी समूहाद्वारे तीन दिवसीय उपक्रम “स्कुल ऑफ लीडरशिप” चे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा उद्देश रायसोनी समूहाला एका उन्नत व सकारात्मक दिशेकडे अग्रेसर करणे हा होता.

उदघाटनाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुरेखा ठक्कर उपस्थित होत्या. रायसोनी समूहाचे अध्यक्ष सुनील रायसोनी व जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. सचिन उंटवालेनी उपस्थितांना संबोधित करताना उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. प्रशिक्षण शिबिराच्या प्रथम सत्रात रायसोनी समूहाचे विविध अधिष्ठाता, विभागप्रमुख, संयोजक व वरिष्ठ अध्यापकांनी सहभाग घेतला. या सत्रात त्यांना नेतृत्व क्षमतेचा विकास, एक प्रभावी नेता होण्याकरिता लागणारे गुण, योजना व संशोधनासंबंधी विषयावर माहिती देण्यात आली. प्रत्येक सत्रात ३० जण सहभागी होते ज्यांना देशभरातील नामांकित व कुशल प्रशिक्षकांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमाच्या मुख्य कार्यकारी आयोगात डायरेक्टर कार्पोरेटर एचआर अश्विन पांडे, डायरेक्टर एसओएएल डॉ. सुरेखा ठक्कर, जी. एच. रायसोनी युनिवर्सिटी अमरावतीचे उपकुलपती डॉ. विनायक देशपांडे, जी. एच. रायसोनी युनिवर्युसिटी साईखेडाचे उपकुलपती डॉ. मिनारा जेश, जीएचआरसीईचे डायरेक्टर डॉ . सचिन उंटवाले, आरजीआय पुणेचे प्रिन्सिपल अँड कॅम्पस डायरेक्टर डॉ. आर. खराडकर तसेच जी.एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेंटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांचा समावेश होता.

mi advt

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज