fbpx

त्वरित करा ‘हे’ काम; अन्यथा…एसबीआयने ग्राहकांना केले अलर्ट

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑगस्ट २०२१ । एसबीआयने आपल्या ग्राहकांना अलर्ट केले असून, पॅन-आधार कार्ड त्वरित लिंक करण्यास सांगितले आहे. पॅन-आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२१ आहे. एसबीआयने या संदर्भात अधिकृत ट्विटर अकाउंटवरून याबाबत माहिती दिली आहे.

ग्राहकांना समस्येपासून लांब ठेवण्यासाठी आणि बँकिंग सेवा कोणत्याही अडथळ्याशिवाय वापरता यावी यासाठी आधार आणि पॅन कार्डला लिंक करण्याचा सल्ला बँकेने दिला. जर पॅन कार्ड आणि आधार कार्डला लिंक न केल्यास पॅन कार्डला निष्क्रिय केले जाईल. त्यामुळे कोणत्याही व्यवहारासाठी याचा वापर करता येणार नाही.

PAN आणि Aadhaar कार्डला लिंक करण्याची अखेरची तारीख ३० सप्टेंबर २०२१ आहे. त्यामुळे लवकरात लवकर पॅन-आधार लिंक करणे गरजेचे आहे. पॅन-आधार लिंक करण्यासाठी एसबीआयचे ग्राहक नवीन आयटी पोर्टल https://www।incometax।gov।in/iec/foportal/ वर जाऊ शकतात.

असे लिंक करा पॅन-आधार ?

यासाठी सर्वात प्रथम इनकम टॅक्सच्या पोर्टलवर जावे लागेल. यासाठी तुम्ही https://www।incometax।gov।in/iec/foportal/ या लिंकचा वापर करू शकता.
होम पेजवर खाली स्क्रॉल केल्यानंतर Link Aadhaar वर क्लिक करा. तुम्ही थेट https://eportal।incometax।gov।in/iec/foservices/#/pre-login/bl-link-aadhaar वर देखील क्लिक करू शकता.
येथे तुम्हाला पॅन, आधार नंबर, आधारवरील नाव आणि १० आकडी मोबाइल नंबर टाकावा लागेल.
यानंतर तुम्हाला आपको ‘I Have Only Year Of Birth In Aadhaar Card’ आणि ‘I Agree To Validate My Aadhaar Details’ चेक करावे लागेल.
यानंतर Link Aadhaar पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमचे काम होईल.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज