चायना मांजाला नाही म्हणू… नायलॉन मांजाविरोधात वन्यजीव संरक्षण संस्थेचा पुढाकार

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२२ । चायना मांज्याची क्रेझ वाढल्याने लहान मुलांच्या हातात देखील हा मांजा बघायला मिळत आहे. गेल्या काही वर्षात चायना मांजा मुळे पक्षांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्याच बरोबर काही भागात माणसांना देखील याची झळ बसल्याचे चित्र आहे. या गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेत चायना मांजावर बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यात देखील या जीवघेण्या मांजा वर कायम स्वरूपी बंदी घालण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिल्या नंतर वनविभाग देखील सक्रिय झाला आहे. त्याच अनुषंगाने वन्यजीव संरक्षण संस्थेने जिल्ह्यातील मांजा विक्रेत्यांना भेटून चायना मांजा ला नाही म्हणू हे घोष वाक्य घेऊन समुपदेशन करण्याचे कार्य हाती घेतले आहे.

जळगाव शहरा सह एरंडोल , भुसावळ, चोपडा तालुक्यातील विविध गावात मांजा विक्रेत्यांना भेटून चायना मांजा बंदी आदेश चे पालन करा आणि चायना , नायलॉन मांजा चे दुष्परिणाम काय आहेत यावर समुपदेशन करण्यात आले.
जळगाव शहरात वन्यजीव संरक्षण संस्थेचे बाळकृष्ण देवरे, सचिव योगेश गालफाडे, जगदीश बैरागी, सागर पहेलवान, राजेश सोनवणे, यांनी या मोहीमेचा शुभारंभ केला. दुकांनदारांना सूचना दिल्या की, चायना मांजा विक्री आणि साठवणूक करणे गुन्हा असून तुमच्या जवळ चायना मांजा आढळून आला किंवा पतंग उडवणार्यांकडून चायना मांजा मिळून आला आणि त्यात सदर मांजा तुमच्या कडून घेतल्याचे त्यांनी सांगितले तरी तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो म्हणून चोरी छुपे देखील हा मांजा विक्री करू नका, पक्षी संरक्षणासाठी हातभार लावा. त्या नंतर दुकानदारांनी देखील याला सहमती दर्शवली शहरात दुकानदार आणि किरकोळ विक्री करणाऱ्यां 8 ठिकाणी भेट दिली असता चायना मांजा आढळून आला नाही असे योगेश गालफाडे यांनी सांगितले. वन्यजीव संरक्षण संस्था राबवित असलेल्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे,

वन्यजीव संरक्षण संस्थे तर्फे जळगांव जिल्ह्या सह नंदुरबार आणि नासिक जिल्ह्यात देखील याच प्रकारे जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे असे संस्था अध्यक्ष रवींद्र फालक यांनी सांगितले. या उपक्रमा साठी वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक, बाळकृष्ण देवरे , रवींद्र सोनवणे, सचिव योगेश गालफाडे, पक्षी अभ्यासक राहुल सोनवणे, सतीश कांबळे, यांचे मार्गदर्शन लाभत आहे. प्रसाद सोनवणे, उपाध्यक्ष विजय रायपूरे ,निलेश ढाके, जगदीश बैरागी, राजेश सोनवणे, ऋषी राजपूत, मुकेश सोनार,स्कायलेब डिसुझा, चेतन भावसार, गौरव शिंदे, दिनेश सपकाळे, कुशल अगरवाल, रितेश सपकाळे, कल्पेश तायडे, प्रदीप शेळके, विनोद सोनवणे, वासुदेव वाढे, दुर्गेश आंबेकर, बापू कोळी, कृष्णा दुर्गे, गणेश सपकाळे, संतोष चौधरी, निवृत्ती आगळे, भूषण कानडजे, हे परिश्रम घेत आहेत.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -