fbpx

सावदा येथे एकाच वेळेस दोन ठिकाणी निघाले नाग ; सर्पमित्रांनी केले बंदिस्त

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२१ । सावदा येथील गांधी चौक परिसरात देवा मसाले यांचे घराजवळ तसेच सोमेश्वर नगर मध्ये कैलास लवंगडे यांचे घरा जवळ आज नाग निघाल्याची माहिती मिळताच सर्पमित्र नीरज नंदाने (फैजपूर) व प्रदीप करोशिया (सावदा) हे त्या ठिकाणी पोहचेल. त्यांही शोध घेतल्यानंतर त्याना खूप मोठे नाग आढळून आले. दोघे ठिकाणी दोघे नाग असल्याचे सांगण्यात आले. सर्प मित्रांनी दोघ नागांना बंदिस्त केलं. 

त्यांच्या सहकार्याने त्याना पकडण्यात यश आले असता त्यांचे सर्वांनी कौतुक केले. अनेकदा शेतशिवार किवा घरात साप आढळून येतात. पावसाळ्याच्या दिवसात बिळामध्ये पाणी शिरल्याने साप बाहेर येतात. अशावेळी नागरिक घाबरून जातात. 

घाबरून न जाता वेळीच सर्पमित्राला किवा वनविभागाला कळवावे. असे सर्पमित्र नीरज नंदाने फैजपूर व प्रदीप करोशिया सावदा यांनी सांगितले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज