fbpx

सावदा पोलीसांची अवैध दारू व पत्याच्या अड्यावर धाड ; सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल जप्त

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२१ । सावदा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रायपूर तसेच लोहार या दोन ठिकाणी सावदा पोलिसांनी कार्यवाही करत एका ठकाणी अवैध दारूची भट्टी उधवस्त केली तर एका ठकाणी जुगार खेळणाऱ्या 3 जणांना अटक केली.

सावदा येथून जवळ असलेल्या रायपूर येथे दिलीप धोंडू कोळी हा इसम आपल्या घरा मागे तापी नदी पात्रा लगत अवैध दारू गाळत असल्याची माहिती मिळल्यावरून सावदा पोलिसांनी येथे कार्यवाही करत सदर दारू भट्टी उधवस्त केली सदर इसमास अटक केली यावेळी कचे पक्के रयासन दारूचे रयासन व साहित्य मिळून सुमारे 37 हजार रुपयांचे साहित्य नष्ट करण्यात आले.

दुसऱ्या एका कार्यवाहीत लोहारा बिट मध्ये लोहारा गावी कुसुबा रस्त्यावर दर्ग्याच्या मागे मोकळ्या जागी काही जण झंना मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळल्यावरून याठिकाणी धाड टाकली असता 8 ते 10 जण पळून गेले मात्र तौफिक शेख मोहमद वय 30 रा रावेर, राजेंद्र रोहिदास वाघ वय 32 रा उतखेडा, व मनोज जयराम महाजन वय 40 रा निंबोल अश्या तीन जणांना ताब्यात घेण्यात आले त्यांचे जवळून सुमारे 3370 रुपये रोख तसेच डावात 3 हजार रुपये रोख व पळून गेलेल्या मधील 5 मोटारसायकल असा सुमारे 1 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल  जप्त केला.

सदर दोन्ही ठिकाणी मिळून 1 लाख 58 हजारांचा मुद्दे माल पोलिसांनी पकडला यावेळी स.पो.नि देविदास इंगोले यांचे मार्गदर्शना खाली पो,उ,नि, राजेंद्र पवार पो.हे.कॉ, पांडुरंग सपकाळे, संजय चौधरी, सुनील कुरकुरे, मोहसीन खान, तुसुफ तडवी, आदींनी ही कार्यवाही केली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज