fbpx

सावदा येथे पोलीस व पालिका प्रशासनातर्फे कोरोना पार्श्वभूमीवर संयुक्त पथसंचलन

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२१ । सावदा येथे कोरोना काळात पालिका प्रशासन तसेच पोलिसांतर्फे लॉकडाउनची अंमलबजावणी होत असून दररोज 11 नंतर दुकानदार विरुद्ध कार्यवाही केली जात आहे. तसेच रिकामे फिरणार्यांवर देखील कार्यवाही करत त्यांची अँटिजेन टेस्ट केल्या जात आहे.

आज दि.20 रोजी शहरात पोलिस व पालिका प्रशासना तर्फे संयुक्तरित्या पथसंचलन करण्यात आले यात शहराच्या प्रमुख मार्गावरुन हे पथसंचलन करण्यात आले यावेळी दुकानदार यांना वेळेचे बंधन पाळण्या बाबत आवाहन तर नागरिकांना विनाकारण वीना मास्क बाहेर न पडण्या बाबत आवाहन करण्यात तसेच घराबाहेर विनाकारण एकत्रित न बसण्या बाबत आवाहन करून नियमाचे उल्लंघन करण्या विरुद्ध कार्यवाहिचा ईशारा यावेळी देण्यात आला. या पथसंचलनात सावदा मुख्याधिकारी सौरभ जोशी, स.पो.नी. देवीदास इंगोले, तसेच नगर पालिका कर्मचारी, व पोलिस कर्मचारी तसेच गृहरक्षक दलाचे कर्मचारी सहभागी झाले होते,

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज