fbpx

लोहारा परिसरात जुगार अड्ड्यावर सावदा पोलिसांची कारवाई ; ६ जण ताब्यात

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२१ । सावदा पो,स्टे हदितील लोहारा येथून उटखेडा रोडवर सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर सावदा पोलिसांनी दी २४ रोजी धाड टाकून कारवाई केली. त्यात सहा जणांना जुगार खेळत असताना रंगेहात पकडून, दोन मोटारसायकली, त्यांच्याकडून रोख रक्कम असा एकूण ४३६००/रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक २४ रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास इंगोले यांना लोहारा शिवारात जुगार अड्डा चालू  असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरुन सावदा पोलिसांनी २४ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास लोहारा गावी उटखेडा  रोड च्या शेत शिवाराच्या रस्त्यात सार्वजनिक ठिकाणी काही इसम जुगार खेळताना दिसले.

याठिकानी अचानक तेथे धाड टाकून सहा जणांना रंगेहात पकडले व त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य  व दोन मोटरसायकली मिळून एकूण ४३६००/ रू असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला.तर ६ जणांना ताब्यात घेण्यात आले यात सागर राजू तायडे कुसुंबा , दाऊत किताब तडवी लोहारा, शेख असिफ शेख किताब रसलपुर, प्रमोद राजू पाटील कुसुंबा, शेख जुबेर शेख न्यामतुल्ला विवरा, कादर रुबाब तडवी लोहारा, यांना अटक करण्यात आली तर एक हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटर सायकल, व एक बजाज प्लेटिना कंपनीची मोटर सायकल जप्त करण्यात आली.

याबाबत सावदा पोलीस स्टेशन तर्फे पोना देवेंद्र वसंत पाटील यांच्या फिर्यादीवरून सावदा पोलीस स्टेशन येथे सदर आरोपींविरुद्ध मू. जु.का. क.१२(अ) तसेच भादवि कलम १८८,२६९,२७० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली देवेंद्र पाटील, मेहरबान पिंजारी, मोहसिन खान पठाण, निलेश खाचणे ,स्वप्निल सपकाळे, प्रशांत पाटील  आदी करीत आहे.सावदा पोलिस करीत आहे, तर सावदा परिसरात अवैध धंद्यावर कार्यवाही होत असताना दुसरीकडे मात्र सावदा शहरात चोरी छुपे सट्टा मात्र जोरात सुरु असून सोबत अवैध दारू विक्री देखील सुरु असून यावर देखील सावदा पोलिसांकडून कार्यवाहिची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज