fbpx

सावदा न.पा. हद्दवाढीत समाविष्ट गौसियानगरसह विविध भागात नविन गटारी व रस्त्यांचे भूमिपूजन

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२१ । सावदा न.पा. हद्दवाढीत समाविष्ट गौसियानगर सह विविध भागात नविन गटारी व रस्त्यांचे भूमिपूजन दी 18 रोजी करण्यात आले.

सदरच्या कार्यक्रमात सुरवातीला लोकनियुक्त नगराध्यक्षा आनिता पंकज येवले यांच्या शुभहस्ते  भुमीपुजन करण्यात आले नंतर माजी उपनगराध्यक्ष व नगरसेविका नंदाताई लोखंडे सह सर्व सत्ताधारी नगरसेवक व नगरसेविका यांनी कुदळी मारली.

यावेळी नगरसेविका सगीरा बी सैय्यद तुकडू, रंजना जितेंद्र भारंबे,करूणा पाटील,जयक्षी नेहते, लिना चौधरी, नगरसेवक विश्वास चौधरी, सत्ताधारी गटनेते अजय भारंबे, विरोधी पक्ष गट नेते फिरोज खान पठाण, राजेश वानखेडे, अपक्ष नगरसेवक राजेंद्र चौधरी, अल्लाबक्ष, इत्तेहाद एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष अकबर खान अमानुल्ला खान, समाज सेवक शेख निसार शेख नबी, अल्लारखा, शौकत खान, शेख शब्बीर, हुसैन भाई चाय वाले, कमालुद्दीन जनाब, कृ.उ.बा. समिती सदस्य सैय्यद अजगर, असलम जनाब इत्यादी मान्यवर उपस्थिती होती. 

सावदा शहरात न.पा. हद्दीत समाविष्ट झालेल्या गौसिया नगर, ताजुशशरिया नगर, मदिना नगर इत्यादी भागात जवळपास गेल्या पंधरा वर्षांपासून गटारी व रस्त्यांची मोठी समस्या होती दर पावसाळ्यात येथील रहिवासी नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तारेवरची कसरत करावी लागत होती सदर भागातील सर्वत्र ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचलेला असतो त्यामुळे दुर्गंधीयुक्त साचलेल्या पाण्यात वादळी वाऱ्यामुळे आलेल्या घानकचऱ्यातून विषारी डांस, मच्छरांचा विविध प्रकारचे किडे कट कुल यांची उत्पत्ती जास्त प्रमाणात होत होती नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत होता  या गंभीर समस्यांला येथील रहिवाशांना सतत तोंड द्यावे लागत होते यासंदर्भात वेळोवेळी येथील नागरिकांनी सदर समस्या सोडविण्याची मागणी करीत होते.

सदरील सर्व विभागाची समस्या कायमची संपवण्या करिता सतत पंधरा वर्षापासून याभागातील  राष्ट्रवादीचे नगरसेवक फिरोज खान पठाण व राजेश वानखेडे यांनी पाठपुरावा करीत होते सदरील सर्व भागात आज दिनांक १८ जुन २०२१ रोजी नवीन रस्ते व गटारी करिता भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. यामुळे येथील रस्ते, गटारी आदी समस्या मार्गी लागणार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज