झांबरे विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जानेवारी २०२२ । ए‌.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी मुख्याध्यापक डी.व्ही.चौधरी यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी दामोदर चौधरी, साक्षी दिलीप थोरात, श्रावणी हेमंत पाटे, प्राची चंदनसिंग परदेशी, प्रियंका सुनील सोनवणे, सृष्टी विशाल कुलकर्णी, भूमिका गोपाळ चौधरी, पूर्वा हेमंत पिंपळे, प्रथमेश गजानन सुरळकर, पायल गजानन थोरात या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित प्रसंग, कविता, त्यांचे जीवन कार्य सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिषा ठोसरे यांनी केले तर आभार प्रदर्शन इ.पी.पाचपांडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर बंधू भगिनींनी सहकार्य केले.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -