जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जानेवारी २०२२ । ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी मुख्याध्यापक डी.व्ही.चौधरी यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी दामोदर चौधरी, साक्षी दिलीप थोरात, श्रावणी हेमंत पाटे, प्राची चंदनसिंग परदेशी, प्रियंका सुनील सोनवणे, सृष्टी विशाल कुलकर्णी, भूमिका गोपाळ चौधरी, पूर्वा हेमंत पिंपळे, प्रथमेश गजानन सुरळकर, पायल गजानन थोरात या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित प्रसंग, कविता, त्यांचे जीवन कार्य सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिषा ठोसरे यांनी केले तर आभार प्रदर्शन इ.पी.पाचपांडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर बंधू भगिनींनी सहकार्य केले.
हे देखील वाचा :
- विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १०वी आणि १२वी परीक्षेच्या तारखा जाहीर
- सरकारी नोकर भरतीतील शिंदे-फडणवीस सरकारच्या गेमचेंजर पॉलिसीमुळे पात्र युवकांना संधी
- 10वी आणि 12वी परीक्षेच्या फीमध्ये वाढ; आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार?
- लाल किल्ल्यावरून मेडीकल शिक्षणासंदर्भात पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा
- विनापरीक्षा नोकरीची मोठी संधी ; 3256 जागांवर निघाली भरती, पगारही भरघोष मिळेल..