fbpx

सावदा येथे दत्त मंदीर संरक्षण भींत व बगीचा विकासकामाचे भूमिपूजन

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२१ । सावदा (प्रतिनिधी) – सावदा येथील गट नंबर ६०२ मधील आरक्षण क्रमांक १९ दत्त मंदीर संरक्षक भींत बाधणे विकसित करणे हे काम वैशिष्टयपूर्ण योजने अंतर्गत सावदा नगरपालिकेने हाती घेतले आहे. ह्या कामास सुमारे १.५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे,
या कामाचे भूमिपूजन दि. १४/०७/२०२१ रोजी सावदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. अनिता येवले यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी नगरसेवक राजेंद्र चौधरी, राजेश वानखेडे, फिरोज खान पठाण, नगरसेविका करुणा पाटील, शबाना तडवी, मीनाक्षी कोल्हे, लीना चौधरी, रंजना भारंबे, मीनाक्षी नेहेते, नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी सौरभ जोशी, बांधकाम लिपिक हमीद तडवी आदी उपस्थित होते सदर काम लवकरच पूर्ण होऊन गेल्या अनेक दिवसापासुनची मागणी असलेले येथील श्रद्धास्थान असलेल्या दत्त मंदिराचे संरक्षक भींत व बगीचा सुशोभीकरण होणार आहे, यामुळे शहराचे सौन्दर्यात भर पडणार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज