सावदा येथे गो वाहतूक करणारा कंटनेर पकडला, ३० गायींची मुक्तता

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । दीपक श्रावगे । रावेरकडून फैजपूरकडे जात असलेल्या कंटेनरमध्ये अवैध गोवंश वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावर गुरुवारी सायंकाळी सावदा येथे पोलिसांनी कंटनेर पकडला. पोलिसांनी ३० पेक्षा अधिक गाईंची मुक्तता करून त्यांना कुसुंबा येथील गोशाळेत पाठविले.

सावदा येथे आज दि.९ रोजी सायंकाळी ७.३० वाजेदरम्यान छुप्या रीतीने कंटेनरमध्ये सुमारे ३० पेक्षा अधिक गायी भरून रावेरकडून फैजपुरकडे जात होत्या. गुप्त माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी सावदा येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ कंटनेर पकडला. कंटेनरचा चालक फरार झाला असून सदर कंटेनर जळगाव येथील बाफना गो शाळेत पाठविण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -