fbpx

महत्त्वाचे : वाचा शनिवार, रविवार जळगावात काय सुरू राहणार

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२१ । राज्य सरकारने मिशन बिगेन अंतर्गत निर्बंध शिथिल केले असून जळगावचा त्यात लेव्हल १ अंतर्गत समावेश होतो. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पारित केलेल्या आदेशानुसार लेव्हल १ अंतर्गत सर्व आस्थापना शनिवार रविवार देखील सुरू राहणार आहेत.

(अधिकृत ऑर्डर बातमीच्या शेवटी आहे.)

mi advt

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गेल्या महिन्यात कडक निर्बंध लागू केले होते. जून महिन्याच्या सुरुवातीला प्रशासनाने निर्बंध शिथील करण्यास सुरुवात केली असून त्यासाठी पाच लेव्हल निश्चित करण्यात आल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील रुग्ण पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड उपलब्धता लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी आदेश पारित केले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील सर्व आस्थापना शनिवार-रविवार देखील सुरू राहणार आहेत. शासनाचा आदेश नागरिकांना फारसा माहिती नसल्याने याबाबत व्यापारी वर्गांमध्ये बऱ्याच शंकाकुशंका होत्या. जळगाव लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाचा आदेश पुन्हा माहितीस्तव देत असून त्यात सर्व आस्थपना शनिवारी व रविवारी सुरू राहणार असल्याचा स्पष्ट उल्लेख जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कोविड रुग्णसंख्या वाढत असल्यास किंवा ऑक्सिजनवर असलेले रुग्ण वाढल्यास या आदेशात सुधारणा करून निर्बंध कडक केले जातील असे देखील जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

सर्व आस्थापना शनिवारी व रविवारी सुरू राहणार असल्या तरी नागरिक व व्यापारी वर्गाने कोरोनाच्या निर्बंधांचे पालन करून बाजारात गर्दी करू नये असे आवाहन आम्ही जळगाव लाईव्ह न्युजच्या माध्यमातून करीत आहोत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज