राखेच्या धुराळ्यात काळवंडला ‘सातपुडा’

वणवा रोखण्यासाठी कर्मचाऱ्यांचा अभाव

जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२१ । उन्हाळ्याची चाहूल लागून मार्च महिना सुरू झाला की, सातपुड्यात  वणवे पेटण्याच्या प्रमाणात वाढ होते. दररोजच्या वणव्यांमध्ये वनसंपदा व वन्यप्राण्यांचे देखील मोठे नुकसान होत आहे. काही ठिकाणी अज्ञानातून तर काही ठिकाणी मुद्दाम वणवे लावले जात आहेत. वणवे रोखण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी व काही वनप्रेमी अहोरात्र प्रयत्न करून लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी झटत आहेत.

सातपुडा पर्वतावर सद्या गेल्या महिन्याभरापासून वणव्यांचे प्रमाण वाढले  आहे. या वणव्यामुळे डोंगर ही उघडे बोडके झाले आहेत. सततच्या वनव्याने सातपुडा राखेच्या धुराळ्यात काळवंडलेला दिसतो आहे.

वारंवार लागणाऱ्याया वणवनव्यांमुळे अमूल्य वनसंपदा त्याचबरोबर औषधी वनस्पतींची देखील नष्ट होत आहे. मोठे वृक्ष ही वणव्यांमुळे होरपळून जात आहेत. वणव्यांमुळे वन्यजीवांचा अधिवास धोक्यात येत आहे.

अनेक छोटे- मोठे वन्यजीव आगीच्या तावडीत सापडून होरपळले जात असल्याने जीवसृष्टीच्या चक्रातून गंभीर परिणाम होत आहेत. तर त्यामुळे कित्येक वन्यजीव गावाकडे धाव घेत असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले आहे. त्यामुळे ठोस उपाययोजना करण्याची मागणी वनप्रेमी करीत  आहे.

अतिक्रमणाच्या उद्देशाने आगी लावतात

सातपुडा पर्वतावर वणवा रात्रीच्या वेळी २० ते २५ किलोमीटर अंतरावरून भयंकर दिसतो,  पुढील वर्षी पावसाळ्यात चांगले गवत यायचे असेल, तर आत्ताचे जाळावे लागते, असा गैरसमज तसेच अतिक्रमण करण्याच्या उद्देशाने वणवे लावले जात असल्याचेही वनप्रेमी सांगतात.  

वनविभागाने लक्ष देणे गरजेचे

सातत्याने लागणाच्या या वणव्यांवर वनविभागाने नियंत्रण आणणे गरजेचे आहे. यासाठी गावागावांतून जनजागृती करायला हवी. वेगवेगळ्या समित्या निवडून त्या माध्यमातून वणवे रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, तरच आगीच्या भक्ष्यस्थानी पडणारी वनसंपदा वाचण्यास मदत होईल. अन्यथा, पर्यावरणाचे नुकसान असेच होत राहिल.

उपाययोजना नाहीत

वणवा हा उंच टेकड्यावर लागत असल्याने याठिकाणी वणवा विझवण्यासाठी जातांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना फार अडचणी निर्माण होत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. याचा अर्थ असा होतो की वनविभागाजवळ पर्वतावर लागलेल्या आगी विझविण्यासाठी शासनाकडून काही एक उपायय योजना नाही. तसेच वनविभागात कर्मचारी संख्या अपुरी पडत असल्याने डोंगरावर लागलेल्या आगी विझवण्यासाठी त्यांना परिसरातील काही वनप्रेमी मदत करतात.

वनप्रेमी करतात मदत

सातपुड्यात वणवा विझवण्यासाठी वन कर्मचाऱ्याची संख्या अपुरी पडते. त्यामुळे त्यांच्या सोबत काही तरुण वनप्रेमी  वन्यजीव संरक्षण संस्था जळगावचे कुशल अग्रवाल, धानोराचे रितेश सपकाळे आदी वणवा विझवण्यासाठी मदत करतात.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज