fbpx

जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभाग उपअधीक्षकपदी सतिश भामरे

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ जून २०२१ । जळगाव अँन्टी करप्शन ब्युरो युनिटचे पोलीस उपअधीक्षक गोपाल ठाकुर हे काल सोमवारी सेवानिवृत्ती झाल्यामुळे त्यांच्या जागी आता उपअधिक्षक सतिष भामरे यांनी कार्यभार सांभाळला आहे.

उप अधिक्षक सतिष भामरे यांनी जळगाव पोलिस दलात सेवा बजावली आहे. बोदवड पोलिस स्टेशन, शहर वाहतुक शाखा तसेच नियंत्रण कक्ष अशा विविध ठिकाणी त्यांनी आपली सेवा बजावली असल्यामुळे ते सर्वांना परिचीत आहेत. त्यांना जळगाव जिल्ह्याची चांगल्या प्रकारे माहिती असल्यामुळे त्यांच्या कामकाजाचा जळगाव अ‍ॅंटीकरप्शन विभागाला निश्चितच फायदा होणार आहे.

सरकारी कामकाज करुन देण्यासाठी लोकसेवकाकडून कुणाला लाचेची मागणी होत असेल व त्यासंबंधी कुणाला तक्रार करायची असल्यास पोलीस उपअधीक्षक सतीष भामरे यांच्याशी संपर्क साधावा किंवा तक्रार नोंदवावी असे आवाहन नूतन पोलीस उपअधिक्षक भामरे यांनी कळविले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज