⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | एरंडोल | एरंडोल तालुक्यात १२वी चा निकाल समाधानकारक

एरंडोल तालुक्यात १२वी चा निकाल समाधानकारक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२२ । एरंडोल तालुक्यात यंदा सर्व शिक्षण संस्था चे बारावीचे निकाल समाधानकारक लागले आहे. डि.डी.एस.पी महाविद्यालय एरंडोल ९८ टक्के, साधना माध्यमिक विद्यालय कासोदा ९७.५६ टक्के, साहजादी उर्दू ज्युनियर काँलेज कासोदा १०० टक्के, अँग्लो उर्दू ज्युनियर काँलेज १०० टक्के, लिटील व्हेली ज्युनियर काँलेज कासोदा ९७.५३ टक्के, गौरी शंकर ज्युनियर काँलेज रंवजे बु. ९३.१८ टक्के, रा.ती.काबरे ज्युनियर काँलेज एरंडोल ९३.१८ टक्के असा निकाल लागला असून सर्वच महाविद्यालयाचे निकाल ९० पैक्षा अधिक तर १०० टक्के पर्यंत लागले आहे.

डि.डी.एस.पी. महाविद्यालय एरंडोल बारावी विज्ञान शाखा ५०१ पैकी ५०० विद्यार्थी पास झाले असून ९९.८० टक्के निकाल लागला आहे. मुर्णाल विनोद बिरारी व सर्वेश प्रदीप मोरे यांनी प्रत्येकी ८५.५० टक्के गुण मिळवून विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक पटकावला. वाणिज्य शाखेचा निकाल ९९.१७ टक्के लागला. रिया कुंदनसिंग परदेशी ही ८१.३३ टक्के गुण मिळवून प्रथम आली. कला शाखेचा निकाल ९२.५३ टक्के लागला. नम्रता विलास पाटील ही ८२.६७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. किमान कौशल्य अँटो, किमान कौशल्य ई.टी. याचा १०० टक्के निकाल लागला. जयेश महाजन हा ६८.३३ टक्के गुण मिळवून प्रथम आला. तर ई.टी शाखेत आकाश सुरेंद्र पाटील याने ६९.३३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. एरंडोल महाविद्यालयाचा एकुण निकाल ९८ टक्के लागला. संस्थाध्यक्ष अमित पाटील, प्राचार्य एन.ए. पाटील व प्राध्यापक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. लिटल व्हेली शाळेत कुणाल हरिश्चंद्र पाटील हा ७६.६७ क्के गुण मिळवून पहिला आला. साहजादी शाळेत सय्यद जाहिद अली नासीर अली हा.८१.५० टक्के गुण मिळवून पहिला आला.
अँग्लो उर्दू शाळेत शे. मारिया ७९.१६ टक्के गुण मिळवून पहिली आली. साधना विद्यालयात निशा विजय जैन व भाग्यश्री मोहिते यांनी ७७.५० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. रा.ती. काबरे विद्यालयात ६९.१७ टक्के गुण मिळवून साक्षी देवराम महाजन ही पहिली आली.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह