fbpx

भुसावळातील सर्वोदय छात्रालयाची जागा पुढार्‍यांकडून हडपण्याचा प्रयत्न

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२१ । भुसावळ शहरातील सर्वोदय संस्थेच्या मिळकती संदर्भात नगरपालिकेच्या दप्तरात पालिका कर्मचार्‍यांशी संगनमत व कट कारस्थान करून व बेकायदेशीर पद्धत्तीने संस्थेच्या नावाऐवजी डॉ.वंदना वाघचौरे यांचे नाव लावण्यात आले असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. 

पालिकेने या संदर्भात सखोल चौकशी केल्यानंतर ही नोंद हस्ताक्षराच्या मोठ्या बदलासह वेगळ्या हस्ताक्षरात चुकीच्या पद्धत्तीने झाली असल्याचे पत्र मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी  दिले असून या प्रकरणी दोषी असलेल्यांसह पालिका कर्मचार्‍यांविरुद्ध गुन्हा  दाखल करावा, अशी मागणी सावकारे यांनी केली आहे.

दोषींवर कारवाईची सावकारेंची मागणी

सावकारे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केलेल्या तक्रार अर्जानुसार, डॉ.वंदना वाघचौरे यांनी संस्थेच्या जागेवर अतिक्रमण व ताबा घेण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ.वाघचौरे यांच्यासह भुसावळातील काही स्थानिक पुढारी संस्थेची जागा गिळंकृत करण्याचा प्रयत्न करीत असल्याने अशांवर कारवाईची मागणी सावकारे यांनी केली आहे.

दरम्यान, अपप्रवृत्तींचा संस्थेच्या आवारात शिरकाव होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी सर्वोदय छायालयाच्या जागेला आपण कुलूप लावले असल्याचे प्रमोद सावकारे यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले. डॉ.वंदना वाघचौरे यांच्याशी संपर्क साधला असतो होवू शकला नाही.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज