खाजोळा ग्रामपंचयात निवडणुकीत सरलाबाई पाटील विजयी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ डिसेंबर २०२१ । पाचोरा तालुक्यातील खाजोळा ग्रामपंचायत वॉर्ड क्रमांक २ च्या पोटनिवडणूकीत सरलाबाई बाळू पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या असून निकालानंतर फटाके व गुलालाच्या उधळणीत विजयोत्सव साजरा करण्यात आला.

संपूर्ण पाचोरा तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या खाजोळा ग्रामपंचायत वॉर्ड क्रमांक २ च्या पोटनिवडणूकीसाठी एकूण २४७ मतदानापैकी २४७ मतदान मंगळवार दि. २१ रोजी झाले, दि. २२ रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला. यात सरलाबाई बाळू पाटील यांना १४६ आणि विरोधी उमेदवार सुवर्णा दीपक पाटील यांना १०१ मते मिळाली.

यावेळी महसूल मंडलाधिकारी भाऊसाहेब साळुंखे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले, त्यांना तलाठी बिडी मंडले आप्पा काळे यांनी मदत केली.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -